75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Weather

विदर्भात वाढणाऱ्या उष्णतेबाबत भारतीय हवामान विभागानंही (IMD) चिंता व्यक्त केली आहे. नागपूरचा पारा पन्नाशी पार गेला असून नागरिकांना भट्टीत भाजल्याचा त्रास सहन करावा लागतोय.

संपूर्ण भारताला मान्सूनचे वेध लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील विदर्भात मात्र सूर्यदेवाचा प्रकोप झाल्याचे चित्र आहे. नागपूरचा पारा पन्नाशी पार गेला असून नागरिकांना भट्टीत भाजल्याचा त्रास सहन करावा लागतोय. विदर्भात वाढणाऱ्या उष्णतेबाबत भारतीय हवामान विभागानंही (IMD) चिंता व्यक्त केली आहे. तसेच उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील केलंय. 1 जून रोजी राज्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.

मुंबईकरांना सहन करावा लागणार उकाडा

मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना तीव्र उष्णतेचा आणि उकाड्याचा सामना करावा लागतोय. 1 जून रोजी मुंबईचं कमाल तापमान 35 तर किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातही उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे.

Prakash Ambedkar : मोदी स्टंटबाज, यावेळी पंतप्रधान होणार नाहीत – प्रकाश आंबेडकर..

पुण्यासह कोल्हापुरात पावसाचं सावट

पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापुरात मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आकाश काही ठिकाणी ढगाळ राहणार आहे. तसेच दिवसभर उकाडा देखील जाणवत आहे. 1 जून रोजी पुणे शहरात 32 अंश कमाल तर 29 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. कोल्हापूर शहरात 1 जून रोजी पावसाची शक्यता वर्तवली असून 30 अंश कमाल तर 28 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा अंदाज आहे.

विदर्भात उच्चांकी तापमान

विदर्भात उष्णतेची लाट आली असून उष्माघाताने काहींचा बळी घेतलाय. मे अखेर म्हणजेच 30 आणि 31 रोजी विदर्भात उच्चांकी तापमान राहिलं. नागपूर शहरात उष्णतेचा पारा पन्नाशी पार गेला. त्यामुळे नागपूरकरांचा ताप वाढला असून हवामान विभागाने योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय. 1 जून रोजी नागपूर, चंद्रपूर, अकोला या शहरांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागपूर शहरात 45 अंश कमाल तर 30 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

मराठवाड्यात उष्णतेत वाढ

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. काही जिल्ह्यात वादळी पावसानंतर उष्णतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज असून रात्रीच्या तापमानातही वाढ झालीय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धारशिव, बीड, छ. संभाजीनगर येथे तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 जून रोजी संभाजीनगरमध्ये 37 अंश कमाल तर 27 अंश किमान तापमान राहील.

Pune Porsche Accident : महाराष्ट्रात आता होणार नाही Porsche सारखं कांड; एक चूक अन् वाजेल घंटी..

दरम्यान, सध्या मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. गेल्या दोन चार दिवसांपासून मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केली नसली तरी चिंतेचे कारण नाही. मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल झाला असून त्या पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

IMD
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...