कात्रजमध्ये लहान मुलांसाठी असणाऱ्या फनफेअर पार्क येथे 9 वर्षाच्या मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला.
कात्रज, राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. कात्रजमध्ये लहान मुलांसाठी असणाऱ्या फनफेअर पार्क येथे 9 वर्षाच्या मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला. लहान मुलांसाठी याठिकाणी करमणुकीसाठी पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाउस अशी साधने उभी करण्यात आली होती. मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशा मुळे झाला याची माहिती मिळेल असे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कात्रज परिसरात फॉरेन सिटी एक्झिबेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी ९ वर्षांचा मुलगा वडिलांसोबत गेला होता. त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणी आयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेश राजू पवार असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. त्याचे वडील राजू पांडू पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय.
…आणि उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, प्रकाश आंबेडकरांना मारला टोमणा..
गणेश हा आचार्य गुरुकुल शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. सोमवारी त्याची सहल जाणार होती. त्याआधी आदल्या दिवशी कात्रज कोंढवा रस्त्यावर मोकळ्या जागेत वडील गणेशला घेऊन एक्जिबेशनमध्ये गेले होते. तिथं लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी वेगवेगळी खेळणी, खेळ होते. विद्युत पाळण्यात बसायला जाताना गणेशचा जाळीला स्पर्श झाला, त्यानतंर विजेच्या झटक्याने तो खाली कोसळला.
गणेशसोबतच वडिलांनाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, तिथं असलेल्या व्यक्तीने काठीने त्यांना ढकलल्याने ते वाचले. हा प्रकार घडताच ऑपरेटरनं लाइट बंद केल्या. तर घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेला संयोजक, विद्युत पाळणा मालक जबाबदार असल्याची तक्रार वडिलांनी केलीय.