75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Gun Firing

Gun Firing : माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला.

Gun Firing : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आलाय. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार केले गाला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला. यात दोघांनाही गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले होते. भुसावळ शहरातल्या जळगाव नाका मरी माता मंदिराजवळ ही घटना घडलीय. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे.

पुणे Porsche अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा अटक होणार?

दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी केली. भूसावळ शहरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 
Gun Firing
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...