Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं आहे.
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत राज्यातून महायुतीच्या फक्त 17 जागा जिंकून आल्या तर महाविकासआघाडीला 30 जागांवर यश मिळालं.
राज्यात 13 जागा पटकावत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला. तर भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षाला प्रत्येकी 9-9 जागा मिळाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागांवर यश मिळालं. अजित पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झाली.
मोदी सरकाच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं?
महाराष्ट्रातल्या या निकालानंतर कोल्हापुरात लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे, अशी पोस्टर कोल्हापुरात लागली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ही पोस्टर लावण्यात आली आहेत, ज्यातून भाजपला डिवचण्यात आलं आहे.