आता चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे एनडीएमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार त्याची. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यावेळी भाजपकडून चारशे पारचा नारा देण्यात आला होता. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. भाजपला एकट्याला बहुमत गाठता आलं नाही. त्यामुळे आता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. एनडीएला पूर्ण बहुमत असल्यानं सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 9 तारखेला नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे आता चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे एनडीएमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार त्याची. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Camel Smuggling : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळात भाजपचे एकूण 18 मंत्री असणार आहेत. तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदं दिली जाणार आहेत. त्यात सात कॅबिनेट तर 11 राज्यमंत्री पदाचा समावेश असणार आहे. टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी दोन मंत्री असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, एलजेपी, जेडीएस आणि हम पार्टीला प्रत्येकी एक मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आभाळातून कोसळला ‘मृत्यू’; पावसाला सुरुवात होताच दोघांनी गमावला जीव..