75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Plane Crash

Plane Crash : विमान कोसळून भीषण दुर्घटना, 19 जणांचा मृत्यूत्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अनिंयंत्रित झालं आणि सकाळी अकराच्या सुमारास ते कोसळलं.

Plane Crash : विमान कोसळून भीषण दुर्घटना, 19 जणांचा मृत्यूनेपाळची राजधानी काठमांडूत विमान कोसळून(Plane Crash) दुर्घटना झालीय. या विमानातून १९ प्रवाशी प्रवास करत होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. काठमांडूहून पोखराला जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आलीय. त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अनिंयंत्रित झालं आणि सकाळी अकराच्या सुमारास ते कोसळलं. हे विमाना सौर्या एअरलाइन्सचं होतं अशी माहिती समोर येतेय.

विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. बचावकार्य सुरू आहे. मात्र यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. यामुळे धुराचे लोट हवेत पसरले होते.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केले.  टेक ऑफ करत असताना विमान अनियंत्रित झाले. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आलीय

Plane Crash
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...