75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crop Competition

Crop Competition : तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुग आणि उडीद या दोन पिकांसाठी 31 जुलै तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.(Crop Competition)

Crop Competition : शेतामध्ये कष्ट करून शेतकरी वेगवेगळी पिके घेत असतो. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून जास्तीत जास्त उत्पादन काढावं, या उद्देशाने राज्य सरकारने पीक स्पर्धा आयोजित केली आहे. पीक उत्पन्नाबाबत शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून घ्यावे, हा या योजनेचा उद्देश आहे.

तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुग आणि उडीद या दोन पिकांसाठी 31 जुलै तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये विजेता ठरलेल्या शेतकऱ्याला राज्य पातळीवर 50 हजार, जिल्हा पातळीवर 10 हजार तर तालुका पातळीवर 5 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेविषयी अधिकची माहिती जालना जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करून पिकाची जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या पीक स्पर्धेत खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, मूग, सूर्यफूल, उडीद आणि बाजरी इत्यादी पिकांचा समावेश आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का, अटक वॉरंट जारी

या योजनेत सहभागी होण्यासाठी या आहेत अटी –

शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर त्या पिकाखालील किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक –

विहित नमुन्यातील अर्ज
ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
सातबारा किंवा आठ अ चा उतारा
शेतकरी आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र
पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
बँक खाते चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

या स्पर्धेत सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला तालुका पातळीवर प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये, तर तृतीय 2 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर जिल्हा पातळीवर प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार तर तृतीय 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. तसेच राज्य पातळीवर प्रथम बक्षीस 50 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 40 हजार रुपये तर तृतीय बक्षीस 30 हजार रुपये इतके आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

लाईट दुरुस्तीसाठी पोलवर चढले पण..; क्षणभरात वायरमननं गमावला जीव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..

 

Crop Competition
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...