75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Weather Forecast

Weather Forecast : या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.

Weather Forecast : राज्यात मान्सूनने जोरदार धडक दिलीये. अशात विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, 13 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 13 जूनला राज्यभरात पावसाची स्थिती काय असेल, जाणून घेऊया.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. दिवसभर इथलं कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 29°C एवढं असेल. तर पुण्याचं हवामान ढगाळ असण्याची शक्यता आहे. शहराच्या काही भागात मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावं. उद्या पुण्याचं तापमान कमाल 35°C आणि किमान 27°C एवढं असेल. कोल्हापुरात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आता उद्यादेखील कोल्हापूरचं वातावरण ढगाळ असेल. तर कमाल तापमान 31°C आणि किमान तापमान 27°C इतकं असेल.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, अलविदा अशी फेसबुक पोस्ट करत तरुणाने जीवन संपवलं

हवामान विभागानं विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विदर्भात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूरचं तापमान उद्या 37°C कमाल आणि 25°C किमान एवढं असेल.

मराठवाड्यातसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळीराजा सुखावलाय. मात्र काही भागांमध्ये पावसासोबत आलेल्या वादळाने मोठं नुकसान झालंय. त्यातच पुढील 48 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरचं तापमान उद्या 35°C कमाल आणि 29°C किमान इतकं असेल. दरम्यान, राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलीये. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.

Weather Forecast
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...