75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Maratha Reservation

Maratha Reservation : ओबीसी आरक्षणात कोणालाही प्रवेश देऊ नये यासंदर्भात राज्य सरकारने ही कृती करू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

Maratha Reservation :  मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षण विषयावर मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर जरांगे यांनी उपचार घेणं सुरू केलंय. दरम्यान, अंतरवाली सराटीत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला विरोध म्हणून अंतरवालीतच आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणासाठी अंतरवाली सराटीला जाताना त्यांना पोलीसांनी त्याब्यात घेतलं होतं. प्रा. लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटीत जाऊन उपोषणाला बसणार होते पण पोलिसांनी त्यांना आधीच बार्शी पोलीस स्टेशनला बोलावून थांबवून ठेवलं होतं.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. लक्ष्मण हाके यांना रात्री एक वाजता नोटीस देऊन पोलिसांनी सोडले. रात्री एक वाजता ते बीडकडे रवाना झाले. अंबड येथील ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असताना पोलिसांनी रोखले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळाजवळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण सुरू करणार होते.

Rohit Pawar : सुनेत्राकाकी आणि पार्थसाठी रोहित पवारांची बॅटींग! म्हणाले, ‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा..

ओबीसी आरक्षणात कोणालाही प्रवेश देऊ नये यासंदर्भात राज्य सरकारने ही कृती करू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. ओबीसी बांधवांच्या मनात एक सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी यासाठी आंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषण सुरू करण्यासाठी हाके जात होते. दरम्यान अंतरवाली सराटी येथे जात असताना बार्शी पोलिसांनी त्यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतलं.

लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत जालन्यातील अंबड शहरात ओबीसी समाजाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केलंय. त्याला विरोध करत ओबीसी बचावाकरिता लक्ष्मण हाके हेही अंतरवालीत आमरण उपोषण करणार आहेत याची घोषणा केल्यानंतर बुधवारी पोलिसांनी हाके यांना स्थानबद्ध केलं होतं. मात्र रात्री त्यांना परत सोडण्यात आलं. लक्ष्मण हाके हे सकाळी 10 वाजेपर्यंत अंबड शहरात दाखल होतील आणि ओबीसी समाजाची ते बैठक घेणार आहेत.

Nagpur Hit and Run : सासऱ्याची हत्या संपत्तीच्या हव्यासातून नाही तर… नागपूरच्या क्लास वन सुनेचे काळे कारनामे

Maratha Reservation
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...