75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Swearing Ceremony

Narendra Modi Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असून येत्या 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता त्यांचा शपथविधी(Swearing Ceremony) होणार आहे.

 Narendra Modi Swearing Ceremony : नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे. 

नरेंद्र मोदींच्या शपथविधी(Swearing Ceremony) सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे. 

2024 च्या लोकसभा निकालांनुसार, एनडीए आघाडी 294 जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी एकट्या भाजप 240 जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला 232 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसनं 99 जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत.

Swearing Ceremony
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...