75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Eknath Shinde

Eknath Shinde : शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात? ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता, निवडणुकीदरम्यान आणि निकालानंतर सहा आमदारांचा ठाकरेंशी संपर्क

Uddhav Thackrey vs Eknath Shinde : मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली आहे.  यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.  

लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 

आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, “6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते.”

“आता लोकसभा निवडणुकांमध्येही अनेक आमदारांनी, अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेत आमचा विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. पण, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की, दरवाजे बंद आहेत.”

Eknath Shinde
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...