75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange Patil : भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पक्षाचा सुफडा साफ करतील असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Manoj Jarange Patil : आता सुट्टी नाही, मराठा समाजाला आम्ही आरक्षण (Maratha Reservation) घेऊनच राहणार आहे. 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. 50 टक्क्यांच्या वर बोलायचं नाही, असे मत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. ते तुळजापुरात (Tuljapur) पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पक्षाचा सुफडा साफ करतील असे जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील मराठा खवळला आहे. त्यांच्यामध्ये  मोठी खदखद असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आहे की, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला समजून घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. राज्यात जेवढे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे की मराठ्यांचे ओबीसीतील आरक्षण द्यायला पाहिजे असे जरांगे पाटील म्हणाले.  तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत आहे, तुम्ही आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले.

मराठ्यांचं वाटोळ करायला सरकार आलं आहे

सगळा मराठा ओबीसी आहे. कुणबीमध्ये ज्यांना यायचे ते येतील ज्यांना नको ते राहतील असे जरांगे पाटील म्हणाले. मी मराठवाडा, खानदेश, विदर्भ असा भेद होऊ देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. सगळे दाखल झालेले गुन्हे मागे घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. मी नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ नये असं मी म्हणलोच नाही. ते जाणून बुजून अंगावर घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  दरम्यान, मराठ्यांचं वाटोळ करायला सरकार आलं आहे, हे मराठ्यांनी समजून घ्यावं असे जरांगे पाटील म्हणाले. 

Manoj Jarange
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...