मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही. मला लोकचळवळीचा मार्ग माहीत आहे. 6 जुनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर 4 जूनलाच मी आमरण उपोषणाला बसणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, विधानसभेची तयारी आम्ही जोरदार करत आहोत. गोरगरिबांचं कल्याण होणार आहे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
…आणि उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, प्रकाश आंबेडकरांना मारला टोमणा..
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यांनी आमचं तर वाटोळं केलंचं आहे, यांना फक्त यांच्या महिला दिसल्या, आमच्या माता भगिणी यांना दिसत नाही. महायुतीने आम्हाला काही दिलं नाही, महाविकास आघाडीवाले देखील शहाणे नाहीत. त्यांनी होतं ते आरक्षण घालावलं, पण आता गोरगरिबाचं कल्याण होणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
फक्त QR कोडवरुन पोलिसांनी घेतला अल्पवयीन मुलाच्या पालकांचा शोध