75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime news

Crime News : मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी शिक्षक अजय जयवंत सासवडे याचा हा संतापजनक प्रकार समोर आला.(Chhatrapati Sambhaji Nagar)

Crime News :  आसेगाव येथील कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळले. या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी शिक्षक अजय जयवंत सासवडे याचा हा संतापजनक प्रकार समोर आला. दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शिक्षक मुलीला त्रास देत असल्याची कुनकुन 2023 मध्ये कुटुंबाला लागली होती, त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला, मात्र तुमची मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या अशा पावित्रा शाळेने घेतला.(Marathi news)

शिक्षकाला समजावून सांगण्याची जबाबदारी शाळेने घेतली. त्यानंतर मुलीने देखील तक्रार दिली नाही त्यामुळे कुटुंबीयांचा समाज झाला की आता हा शिक्षक मुलीला त्रास देत नसावा. मात्र 17 मे रोजी आत्महत्या केली, काही दिवसानंतर आई मुलीचे दप्तर पाहत होती. तेव्हा त्यात स्मार्टवॉच आढळले. डिस्प्लेवर अजयचा वॉलपेपर होता. अजयनेच ते बळजबरीने दिल्याची आईला खात्री पटली.

विदर्भात सूर्याचा प्रकोप! नागपूरची झाली भट्टी, पारा पन्नाशी पार, IMD ने दिला हाय अलर्ट..

मुलीकडे दोन पत्रेदेखील आढळली. अजयने नेहाला बळजबरीने प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. आईने अखेर दौलताबाद पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारधे यांनी त्याला अटक केली.

अल्पवयीन मुलीला डायरी लिहायची सवय होती. तिने इंग्रजी, मराठीत तिच्या डायरीत शिक्षक अजयबद्दल लिहिलं होतं. मम्मी, सर घरी आले होते, मी तुला सांगू शकले नाही असं त्या डायरीत लिहिल्याचं आढळलं आहे. अजयनं तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचं समोर आलंय. मुलीच्या वडिलांचं वर्षभरापूर्वी निधन झालंय. त्यानंतर मुलीने असं आयुष्य संपवल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Pune Porsche Accident : महाराष्ट्रात आता होणार नाही Porsche सारखं कांड; एक चूक अन् वाजेल घंटी..

crime news
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...