75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

गोळीबार

Firing On Ex-Mayor in Malegaon:  मालेगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल मलिक युनूस इसा असं त्यांचं नाव असून AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात माजी महापौर मलिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल मलिक हे सध्या AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत. साधारणतः मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात मलिक गंभीर जखमी झाले आहेत. मलिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी मलिक यांना नाशिक येथे हलवण्यात आलं आहे. अब्दुल मलिक हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते, त्यावेळी अज्ञातांनी मलिकांवर गोळीबार केला. MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी केली आहे. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोप आमदार मुफ्ती यांनी केले आहेत. दरम्यान, अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावरील हल्लानंतर मालेगावात तणावाचं वातावरण पसरलं आहे. 

गोळीबार
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...