महायुतीनंतर आता महाविकास आघाडीच्या हालचालींनाही वेग आला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत या 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यापैकी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
काँग्रेसतर्फे पुण्यातून लोकसभा कोण लढवणार? याबद्दल बरेच तर्कवितर्क लढवण्यात येत होते. माजी नगरसेवक वसंत मोरे देखील लोकसभा लढवण्यास इच्छूक होते. अखेर सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून काँग्रेसने आपल्याच उमेदवारावर डाव लावला आहेत. विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के. सी. पाडवी यांचे चिरंजीव, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्याचं निश्चित झालं आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पुढील नावांना हिरवा कंदील मिळाल्याची सूत्रांची माहिती
चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार”
अमरावती – आ.बळवंत वानखेडे
नागपूर – आ.विकास ठाकरे
सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आ.रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी (मुलगा)
नागपूर – आ.विकास ठाकरे
गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
गडचिरोली – नामदेव किरसान
अकोला – अभय पाटील
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ कलगे
या नावांवर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.