रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये घडला आहे. याप्रकरणी एका राजकीय मद्यधुंद राजकीय नेत्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये घडला आहे. याप्रकरणी एका राजकीय मद्यधुंद राजकीय नेत्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील मंठामध्ये हा प्रकार घडला आहे. दोन आरोपींनी शासकीय विश्रामगृहातील खोलीत घुसून असभ्य वर्तन केलं आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचायतमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवारी 38 वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या. नुकत्याच रुजू झाल्यामुळे त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत करण्यात आली होती.
ही महिला अधिकारी आपल्या खोलीत थांबलेली असताना मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन इसम त्यांच्या खोलीत घुसले, त्यापैकी एकाने मी भाऊसाहेब गोरे असून मी डीपीटीसी मेंबर आहे. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. यानंतर महिला अधिकाऱ्याने मला तुमच्या सहकाऱ्याची गरज नाही, असं म्हणत खोलीतून बाहेर जायला सांगितलं. तरीही दोघांनी खोलीतून बाहेर न जाता खोलीतच थांबून महिलेच्या मनास लज्जा वाटेल, असं वर्तन करून विनयभंग केला. एवढच नाही तर त्यांनी धमक्या देऊन अर्वाच्य भाषाही वापरली.
हे दोघं एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी धमक्या देत अर्वाच्य भाषा वापरली. याप्रकरणामुळे भयभीत झालेल्या महिला अधिकाऱ्याने काल जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची भेट घेऊन त्यांना घडलेली घटना सांगितली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा नोंदवण्याची सूचना केली. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी भाऊसाहेब गोरे आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.