75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शहरात हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच निलंबित पोलिसानेच गोळी झाडून व्यापाऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना आता वाळूज औद्योगिक परिसरातून आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे.

एकाच आठवड्यात झालेल्या या दुसऱ्या हत्येमुळे पोलिसांचं भय संपलं आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता समोर आलेल्या घटनेत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कायदा सुव्यवस्था धाब्यावर आली असून साजापूर परिसरात पुन्हा एक खून झाला आहे.

ऐन निवडणुकीत शिर्डी हादरली! भरदिवसा गोळीबार, हॉटलेच्या खिडकीतून गोळी आरपार, नेमकं काय घडलं?

एका आठवड्यात वाळूज औद्योगिक परिसरातील हा दुसरा खून आहे. यात एकाचा मृत्यू तर दुसरा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. एका हॉटेलमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. तिथून काही अंतरावरच मृताचा साथीदार देखील गंभीर जखमी अवस्थेत सापडला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. राजू मुरकुटे असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर ज्ञानेश्वर देवरे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे.

दुसऱ्या एका घटनेत वाळुजमध्ये आठवडाभरापूर्वीच व्यापाऱ्याचा खून झाला होता, त्याचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलं. धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवलं होतं. ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 

मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर रामेश्वर काळे होता. पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला मृत व्यापारी सचिन नरोडे याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मागील दोन महिन्यापासून आरोपी काळे हा मृत व्यापाऱ्याच्या मागावर होता. रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज नव्हती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने व्यापाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली

खून
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...