75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime News : बहिण नशेत असताना कंपनीतील सहकाऱ्याने तिच्याशी लैगिंक संबंध प्रस्थापित केले. याचा राग डोक्यात धरुन भावाने वीट डोक्यात घालून खून केल्याची घटना घडली आहे.

Crime News : मानलेल्या बहिणीवर मित्राने लैंगिक अत्याचार केल्याच्या (Pune Crime News)  रागातून भावाने खून केल्याची घटना समोर आला आहे.बहिण नशेत असताना कंपनीतील सहकाऱ्याने तिच्याशी लैगिंक संबंध प्रस्थापित केले. याचा राग डोक्यात धरुन भावाने वीट डोक्यात घालून खून केल्याची घटना  घडली आहे.   शुक्रवारी (5 एप्रिल) भूमकर वस्ती, वाकड (Bhumkar Wasti)  येथील भामा पर्ल सोसायटीत ही घटना घडली आहे.   निकेतन कुणाल विजयकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी लोकेंद्र किशोर सिंहवर हिंजवडी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3  एप्रिल रोजी 25 वर्षीय तरुणी आणि निकेतकुणाल यांनी एकत्र पार्टी केली. दोघांनी मद्यपान केलं होतं. दारू जास्त झाल्याने निकेतकुणालला तरुणीने रूमवर सोडण्यास सांगितले, पण निकेतकुणाल तरुणीला स्वतःच्या फ्लॅटवर घेऊन गेला. मद्यधुंद असलेल्या दोघांमध्ये ‘त्या’ रात्री शारीरिक संबंध झाले. दुसऱ्या दिवशी शुद्धीत आलेल्या तरुणीने निकेतकुणालवर अत्याचार केल्याचा आरोप केला आणि ती तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी याबाबतची माहिती तिने लोकेंद्र किशोरसिंह म्हणजेच मानलेल्या भावाला दिली. चिडलेल्या लोकेंद्रने थेट निकेतकुणालला भेटून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लोकेंद्रने निकेतनकुणालला बेदम मारहाण केली. तो गंभीर जखमी झाला. लोकेंद्र तिथून निघून गेला. निकेतनकुणालने रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. 

त्यानंतर निकेतनकुणाल मग घरी गेला आणि आपल्यावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल होईल,  आपली बदनामी होईल या भीतीने निकेतकुणालने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृत्यू झाला. पण, शवविच्छेदन अहवालात  निकेतनकुणालच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची समोर आल्याने हिंजवडी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.  तिघेही हिंजवडीतील एका कंपनीत काम करत होते.  त्या रात्री नक्की काय घडले? भांडण, मारहाण झाली तेव्हा तरुणी उपस्थित होती का?  या सर्व गोष्टीचा तपास पोलीस करत आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...