Crime News : नांदेड शहरातील वाघी रोड भागात झालेल्या हॉटेल व्यावसायीकेच्या खुनाचा उलगडा झाला असुन मुलानेच आपल्या वडिलांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
Crime News : मुलगा हा आपल्या घरच्यांसाठी खूप मोठा आधार असतो. तो वंशाचा दिवा असतो आणि त्याच्यामुळेच वंश पुढे नेला जातो. ज्यामुळे मुलाचा जन्म झाला की घरचे खूप आनंदी होतात. त्यात एका बापासाठी तो खूप आधार असतो, उतरत्या वयात मुलगाच आई-वडिलांचा सांभाळ करतो. असं असलं तरी एक असं प्रकरण समोर आलं आहे जिथे एक मुलामुळेच बापाचा मृत्यू झाला आहे. ही घटना खरंच ऐकताना खूपच धक्कादायक आणि अविश्वसनिय वाटते. पण हे सत्य आहे.
नांदेड शहरातील वाघी रोड भागात झालेल्या हॉटेल व्यावसायीकेच्या खुनाचा उलगडा झाला असुन मुलानेच आपल्या वडिलांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आईसोबत वडिलांचे रोजचे वाद व्हायचे. शिवाय वडिलांचे अनैतिक संबंध होते या रागातून मुलाने वडिलांची हत्या घडवली, असे पोलिस तपासात समोर आले.
नक्की काय घडलं?
एक सप्टेंबर रोजी वाघी रोड येथे राहत्या घरी शेख युनूस यांचा खून झाला होत. अज्ञात मारेकऱ्यांनी पहाटे घरात घुसून खून केल्याची तक्रार मयत शेख युनूस यांचा मुलगा शेख यासेर यांनी पोलिसांना दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना मुलावर संशय होता, अखेर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
आई सोबत रोजचे वाद आणि वडिलांचे बाहेर असलेले अनैतिक संबंध याच्या रागातून खून घडवल्याची कबुली शेख यासेर याने दिली. शेख अमजत आणि योगेश निकम यांना त्याने दोन लाखाची सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवून आणली. तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.