Weather Update : गुरुवारीच राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update : आज संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील सगळ्याच भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर, उत्तर कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मोदी सरकाच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं?
आज राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
यानंतर पुढील सलग 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो
पुढील सात ते आठ दिवस पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात देखील पुढील 7 ते 8 दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत.
आभाळातून कोसळला ‘मृत्यू’; पावसाला सुरुवात होताच दोघांनी गमावला जीव..