75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime News : मागील काही दिवसांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडलेले असताना आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन दोघांनी आपल्याच मित्राला दारु पाजून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संगमनेर-लोणी रस्त्यापासून सुमारे तीस फूट आतील मैदानात शुक्रवारी रात्री सदरचा प्रकार घडला. सकाळी तो लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. अवघ्या दोन तासांतच दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

20 वर्ष फरार असलेला मोस्ट वॉन्टेड Gangster Prasad Pujari नेमका कोण आहे?

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुनारास समनापूर शिवारातील हॉटेल नेचरजवळ घडली. शनिवारी सकाळी आठ वाजता समनापूरचे पोलीस पोटील गणेश शेरमाळे यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर उपअधीक्षक सोमनाथ घावचौरे यांनी दोन पथक तयार करुन आरोपींचा शोध सुरू केला.(Crime News)

घटनास्थळी बिअरच्या तीन बाटल्या, काडेपेटी, चप्पल, चाकू आणि झटापट झाल्याच्या खुणा आढळून आल्या. बिअरच्या बाटल्या कुठून खरेदी केल्या याचा तपास लागल्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी तात्रिक तपास करुन दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांच्या कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...