75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

Ahmednagar Crime News : किरकोळ वादातून झालेल्या वादातून माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नाही म्हणून पतीने माहेरी जात चक्क मेहुण्याच्या मुलालाच पळवून नेण्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील गोदावरी पट्ट्यातील नायगाव येथे घडला आहे.

याबाबत पळवून नेलेल्या मुलाच्या आईने तालुका पोलिसात ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी सासू, सासरे, नणंद, पती यांच्याबरोबर राहते. आपली नणंद व तिचा पती यांच्यात घरगुती किरकोळ वाद झाल्याने नणंद आणि तिचा मुलगा आमच्याकडे दहा दिवसांपासून राहत आहेत .

या घटनेच्या दिवशी सासु व नणंद हे शेतात चांदेगाव येथे कांदे लावायला गेले होते. त्यादिवशी दुपारी नणंदने सांगितले की माझा पती आम्ही कांदे लावत असताना तेथे आला व त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह करत होता. परंतु, मी त्याला विरोध केल्याने आमच्यात किरकोळ वाद झाल्याने तो तेथून निघून गेला.

त्यानंतर दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या सुमारास नणंद व सासू हे नायगाव येथे कामाला गेलेले असताना नंदोई हा त्या ठिकाणी आला व त्याने मुलाला दुकानात घेवून जातो असे म्हणत त्याला बाहेर गेला. तेव्हा आपण त्यास विरोध केला मात्र तो त्याला बाहेर घेवून गेला. मात्र, आहेर जावून आपण पाहिले असता मुलगी खेळताना दिसली मात्र आपला मुलगा हा काही दिसला नाही.

त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही, त्यामुळे आपला नंदाई यानेच पत्नीबरोबर झालेल्या वादाच्या कारणातून माझ्या मुलाला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरूनपोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलाचा शोध घेतला जात आहे.

Crime News
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...