75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Porsche Car

पुणे Porsche कार(Porsche car) अपघात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. नवे खुलासे होते आहेत. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

पुणे पोर्शे कार(Porsche Car) अपघात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. नवे खुलासे होते आहेत. दरम्यान आता या कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून त्यासंदर्भात बाल न्याय मंडळाला पत्र पाठवण्यात आलं आहे. बाल न्याय मंडळानं परवानगी दिल्यास पुणे पोलिसांना या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची चौकशी करता येणार आहे. अल्पवयीन तरुणाचे नातेवाईक किंवा त्याच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी केली जाईल. तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून होणारी ही चौकशी महत्त्वाची ठरू शकते.

 

दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला पोर्शे कार(Porsche Car) अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची चौकशी करायची आहे. त्यांनी त्या संदर्भात बाल न्याय मंडळाला पत्र देखील पाठवले आहे. मात्र सध्या या मुलाचे वडील आणि आजोबा  कस्टडीमध्ये आहेत, तर आई फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे  बाल न्याय मंडळानं चौकशीची परवानगी दिल्यास अल्पवयीन आरोपीची चौकशी ही त्याचे वकील किंवा दुसऱ्या नातेवाईकांसमोर होऊ शकते.

Manoj Jarange Patil : फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पाटील पुणे कोर्टात हजर…

काय आहे नेमकं प्रकरण? 

पुण्यामध्ये एका भरधार पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना कल्याणीनगर परिसरात घडली होती. या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानं पुणेकरांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान त्यानंतर आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.  या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल हे कोठडीत आहेत.

Weather update : उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा; पावसाबाबत IMD कडून मोठी बातमी..

Porsche Car
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...