75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. देशासह राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील मतदार यावेळी कोणाच्या पारड्यात मत टाकतायेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागच्या दोनचार वर्षात राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. ठाकरे सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्यात आले. त्यानंतर सर्वजण पहिल्यांच लोकसभा निवडणुकीला सामारे जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष मुलाखत दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा मागे पडतोय. मोदीजी विकासाचे मुद्दे मांडतायेत. विरोधक प्रचार इतर मुद्यांकडे नेतायत. विरोधक जनहिताच्या मुद्यावर बोलतच नाहीत. जनतेचे मुद्दे विरोधकांना कळलेले नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली. तर उमेदवारी देताना इलेक्टिव्ह मेरिट महत्त्वाचं आहे. सर्वानुमते सुनेत्रा पवारांचं नाव ठरलं. सुनेत्रा पवारांनी मतदारसंघात अनेक कामं केली. मतदारसंघातील जनतेच्या त्या परिचयाच्या आहेत. बारामतीत अनेक शिक्षण संस्था सुरू केल्यात. विरोध पत्करून शिक्षण संस्था सुरू केल्या. केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा आहे. कृषी विकास संस्था सुरू केली. दुग्ध व्यवसायालाही चालना दिली. संस्था काढणं नाही, चालवणं महत्त्वाचं. संस्था चालवणं सोपं काम नाही, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांना टोला लगावला.

Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली…

राज्यात अनेक संस्था डबघाईला आहेत. संस्थेचा दर्जा टिकवणं आव्हानात्मक असते. विकास कुणी केला हे बारामतीकरांना कळतं. दिलेल्या संधीचं सोनं करणं महत्त्वाचं आहे. चव्हाणांनीही त्यांना संधी दिली होती. प्रत्येकाला कुणी न कुणी संधी देत असतं. विश्वास सार्थ ठरवणं हे महत्त्वाचं आहे, असंही अजित पवार यांनी सांगितले.

शिंदे सुरतेत असतानाच सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव : अजित पवार
आम्ही गद्दारी केलेली नाही. आम्ही आमचा मार्ग निवडला. खरा राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमच्यासोबत आहे. कार्यकर्त्यांचंही आम्हाला पाठबळ आहे. शिंदे सुरतेत असताना सरकारमध्ये जाण्याची तयारी होती. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची याला सहमती होती. शरद पवारांना याबाबतची माहिती होती. राष्ट्रवादीनं तीन जणांची समिती नेमली होती. त्रिसदस्यीय समिती अमित शाहांसोबत चर्चा करणार होती. दूरध्वनीवरून चर्चेला शाहांनी नकार दिला. समोरासमोर बसून चर्चेचा प्रस्ताव शाहांनी दिला होता, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

अनेकदा पवारांनी भूमिका बदलली : अजित पवार
अनेकदा शरद पवारांनी भूमिका बदलली आहे. 2014 सालात बाहेरून पाठिंबा दिला. राजीनामा देण्याचं नाटक केलं. प्रत्येक गोष्ट वरिष्ठांच्या सहमतीनं झाल्या. आमच्याकडून ‘त्या’ आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत होती. भाजपला पाठिंबा देण्याबाबत अनेक बैठका झाल्या. 2017 मध्येही भाजपसोबत जाण्याचं ठरलं होतं. तेव्हा शिवसेनेला बाजूला करण्याची मागणी होती. अमित शाहांकडून या प्रस्तावाला थेट नकार देण्यात आला. वारंवार भूमिका बदललेल्या गेल्या, असा आरोपच अजित पवार यांनी शरद पवारांवर लावला आहे.

भाजपला पाठिंबा ही रणनीती म्हणतात. शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी रणनीती म्हणतात. पवार साहेबांनी केलं की रणनीती. मग आम्ही केलं की गद्दारी कशी? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. खरगेंसोबत तेव्हा वाद झाला होता. राष्ट्रपती राजवट कुणामुळे हे विचारा? शपथविधीबाबत ज्येष्ठांना माहीत होतं. मोजक्या लोकांना शपथविधीची माहिती होती. काँग्रेसच्या आमदारांचीही तयारी होती. एका उद्योगपतीलाही शपथविधीची माहिती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. गुप्त मतदानाचा निर्णय फिरल्यानं फिसकटल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे.

चालत्या बसमध्ये कंडक्टरवर हल्ला; मोबाईल अन् चाकू खिडकीतून फेकला, प्रवाशांमध्ये गोंधळ

आमच्याकडे संख्याबळ होतं. आमदारांना वाऱ्यावर सोडत नाही. मी नेहमीच शब्दाला महत्त्व दिलं आहे. कोरोनामुळे विकासकामं थांबली होती. मतदारसंघात विकासकामं होणं गरजेचं होतं. माझ्यावर निधीत दुजाभावाचा आरोप झाला. मात्र, हाच आरोप करत काही लोक सरकारबाहेर गेले होते. निधीवाटप सीएमच्याच मंजुरीनं ठरतं. त्यामुळे निधीवाटपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे अजित पवारांनी सांगितले. फडणवीसांची प्रशासनावर चांगली पकड आहे. माझीही प्रशासनावर चांगली पकड आहे, त्यामुळे आम्ही सोबत आलो.

रोहितला संधी मी दिली : अजित पवार
रोहितला संधी मी दिली, राजकारणाकडे ओढा होता. रोहित पवारला मतदासंघही मीच सुचवला. फडणवीसांनी बारामतीसंदर्भात बैठका घेतल्या. अनेक बैठकांनंतर सहमती झाली. बदललेली समीकरणं सर्वांना सांगितली. आढळराव राष्ट्रवादी स्थापनेपासूनच सोबत होते. ‘जानकर माढा किंवा परभणीसाठी आग्रही होते. इच्छुकांची समजूत काढून जानकरांना उमेदवारी दिल्याचे पवारांनी सांगितले. भुजबळांचं नाव नाशिकसाठी आघाडीवर होतं. वरिष्ठ पातळीवरूनच नाव सुचवण्यात आलं होतं. नाशिकसाठी लवकरच उमेदवार जाहीर होईल, असा विश्वास अजित यांनी व्यक्त केला.

मुंबईत राष्ट्रवादीची तितकी ताकद नाही. मुंबईत ताकद वाढवण्याचे प्रयत्न आहे. लोकसभा आणि विधानसभेचं जागावाटप वेगळं आहे. आम्हाला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. निवडणुकीनंतरच्या युतीवर विश्वास नाही. त्यामुळे मतविभागणीचा फटका बसू शकतो. विधानसभेतही आमची युती असणार आहे. पालिकेत युतीचं आताच सांगू शकत नाही. मुस्लिम लांगुलचालनाचं राजकारण करत. मतभेदांचं मुद्दे बाजूला ठेवतो, विकास मुद्यावर पुढे जातो. निवडणूक विकासावर लढवावी. विकास हवा असेल तर जनता सोबत येते. कौटुंबिक संबंध आणि राजकारण वेगळं आहे. कुटुंबात दुरावा येणार नाही. प्रश्नांची बेधडक उत्तरं देतो, कुणाच्याही प्रश्नाला घाबरत नाही. शिंदे सुरतला असतानाच सरकारमध्ये सहभागाची तयारी, होती असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...