पुण्यातून 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण झालेल्या इंजिनिअर तरुणीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा व विमानतळ पोलीस पीडित तरुणीचा शोध घेत होते. पण, पुणे पोलिसांना अपयश आले. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. या तरुणीच्या आईवडिलांकडे तब्बल 9 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22, रा. विमाननगर) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही मराठवड्यातील राहणारे आहेत. शिवम हा रायसोनी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञानाच्या तृतीय वर्षाला शिकतो. तर, जाधव आणि इंदूरे हे त्याचे मित्र आहेत. याप्रकरणी तिचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय 49, रा. हरंगुळ, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मुळची लातूर जिल्ह्यातील हरंगूळची राहणारी आहे. ती वाघोली येथील जी. एस. रायसोनी महाविद्यालयात ‘बीई कॉम्प्युटर्स’ या कोर्सच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होती.
भाग्यश्री 30 मार्च रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास कॉलेजवरुन विमाननगर येथील रूमवर आली. त्यानंतर, ती नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलमध्ये गेली. मॉलमधून बाहेर पडल्यानंतर तिला मित्र शिवम आणि त्याचे साथीदार सागर आणि सुरेश या तिघांना सोबत नेले. त्यानंतर तिचा संपर्क तुटला. तिच्या कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याशी संपर्क होत नव्हता. तिचा फोन बंद येत होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी तिचा खुन केला. मृतदेह सुपा गावाजवळ पुरला. त्यानंतर तिचे अपहरण केल्याचे म्हणत वडिलांना 9 लाखांची खंडणी मागितली. तिच्याच मोबाईलवरून ही खंडणी मागत भाग्यश्री हिच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले होते.
‘कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही’; राष्ट्रवादी च्या आमदाराची खदखद बाहेर
पुण्यामध्ये ‘बीई कम्प्युटर्स’च्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या तरुणीचे अपहरण करून तिचा खून (Murder) करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा खून करून मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. या तरुणीच्या आईवडिलांकडे तब्बल ९ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३० मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलजवळून तिचे अपहरण करण्यात आले होते.
पुण्यातून 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण झालेल्या त्या इंजिनिअर तरुणीची हत्या. गुन्हे शाखा व विमानतळ पोलीस त्या तरुणीचा शोध घेत होते. पण, पुणे पोलिसांना अपयश आले. इंजिनिअरिंगचा मित्र असलेल्या शिवम फुलावळे-पाटील व भाग्यश्री सुडे हे भेटले होते. दुसऱ्या दिवशी ती (३० मार्च) गायब झाली. त्याच दिवशी तिचा खुन केला. मृतदेह सुपा गावाजवळ पुरला. त्यानंतर तिचे अपहरण केल्याचे म्हणत वडिलांना 9 लाखांची खंडणी मागितली. तिच्याच मोबाईलवरून ही खंडणी मागत भाग्यश्री हिच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले होते.
कर्जबाजारी मित्रांसोबत तरुणीची हत्या
आरोपींना पैशांची आवश्यकता होती. सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी झालेले होते. त्यांना भाग्यश्रीच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती होती. त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात असे त्यांना वाटले. भाग्यश्री ही त्यांच्यावर विश्वास ठेवणारी होती. तिला सोपी शिकार म्हणून आरोपींनी खंडणीसाठी निवडले. त्यानंतर तिचे अपहरण करून खून केला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.