75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मोटर

मोटर सुरू करायला गेलेले दोघं भाऊ घरी परतलेच नाहीत, मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं. मात्र, शेततळं गच्च भरलेलं असल्यामुळे मुलांचा जीव वाचवता आला नाही..

निफाड येथील वैनतेय विद्यालयामध्ये शिकणारा प्रेम गोपाळ ढेपले ( 15 ) आणि त्याचा लहान भाऊ प्रतिक गोपाळ ढेपले (13 ) या दोघांचा घराजवळील शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर ही घटना घडली. बुधवार 29 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती.

मात्र अर्धा पाऊण तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्याकरता गेली. परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका देखील आली. त्यामुळे जवळपास शोध घेतला गेला. यावेळी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले. मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं. मात्र, शेततळं गच्च भरलेलं असल्यामुळे मुलांचा जीव वाचवता आला नाही.

Pune News : पुणे हादरलं! पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर 30 वर्षीय तरुण रक्ताच्या थारोळ्यात..

प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा. मात्र, त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला. त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असेल, असा अंदाज लावला जात आहे.

गोपाळ ढेपले यांची दोन्ही मुलं या अपघातात मृत्यूमुखी पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तीनच महिन्यांपूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचेही निधन झालेले आहे. या दुर्घटनेचे वृत्त समजतात परिसरात एकच खळबळ उडाली. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

पुणे Porsche अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा अटक होणार?

मोटर
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...