75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Weather Update

Weather Update : आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तर, पालघर आणि ठाण्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहणार असून हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

आज सिंधुदूर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(Weather Update)

या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या घराला घेराव आंदोलन! औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा, नेमकं काय घडलं?

2 जून रोजी ब्रह्मपुरी येथे 46.5°C कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर, बारामती येथे 23.1°C हे सर्वात कमी किमान तापमान होतं.

मुंबईसह उत्तर कोकणातील तापमानात गेल्या काही दिवसांत वाढ झाली होती. आता उष्णतेत काहीशी घट झाली असून या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 3 जून रोजी मुंबईचं कमाल तापमान 32 तर किमान 27 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत राज्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.

Accident News : सांगोल्यात कार चालकाने दुचाकीस्वारांना हवेत उडवलं; 3 तरुण जागीच ठार…

 
 
Weather Update
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...