75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident
Accident

Accident News :  सांगोला तालुक्यातील बामणी येथे भीषण अपघातात 3 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

Accident News :  सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघात एक जण जखमी झाला. ही घटना ताजी असतानाच आता सांगोल्यात घडलेल्या एका अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सांगोला तालुक्यातील बामणी येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही तरुण लांब फेकले गेले.

दुचाकी आणि टाटा कंपनीच्या व्हिस्टा कार एकमेकांना धडकल्याने ही घटना घडली.

यामध्ये दुचाकीवर स्वार असलेले धिरु कोळेकर, विठ्ठल दिवटे आणि म्हाळापाप्पा धनगर (रा. निपाणी ता चिकोडी बेळगाव) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावून पळ काढला.

Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...