Viral Video : मुंबईच्या रस्त्यावर नशेत वाहन चालवून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Viral Video : मुंबईच्या रस्त्यावर नशेत वाहन चालवून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या तरुणाने अंधेरी पूर्व भागात बेदरकारपणे गाडी चालवत उभ्या असलेल्या कारला धडक दिली होती.
सुरज झामन साव असं या आरोपीचं नाव असून तो 26 वर्षांचा आहे. सुरज हा पर्यटक वाहन चालवतो. कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असता तो नशेत होता, हे स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सुरजने दरवाजाच्या बाहेर येऊन गाडी चालवली होती.
30 जुलैला अंधेरी पूर्व भागात अंधेरी ते घाटकोपर लिंक रोडवरील ड्रॅगन फ्लायओव्हरजवळ 12.30 वाजण्याच्या सुमारास सुरजने नशेमध्ये गाडी चालवत स्टंटबाजी केली होती, या स्टंटबाजीमध्ये काही गाड्यांचं नुकसान झालं होतं. सुरजच्या या स्टंटबाजीचा व्हिडिओही समोर आला होता, यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून अटक केली आहे.