75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Viral Video

Viral Video : तरुणांनी वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करण्यास सुरुवात केली, यावेळी अर्धा तास तरुणांनी गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Viral Video : वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. अशा परिस्थिती लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी स्विमिंग पूल, रिसॉर्ट अशा ठिकाणांचा आधार घेताना दिसतात. उन्हाळ्यात याठिकाणी तरुण, तरुणी मोठ्या संख्येने येतात. अशाचप्रकारे उन्हाळ्यात काही तरुणांना वॉटर पार्कमध्ये मोफत एन्ट्री हवी होती. मात्र मोफत एन्ट्री न मिळाल्याने तरुण संतापले आणि ते थेट बुलडोझर घेऊन वॉटर पार्कमध्ये पोहोचले, यानंतर त्यांनी असा काही गोंधळ घातला की, ते पाहून उपस्थित लोक हैराण झाले. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

राजस्थानमधील चित्तोडगड रोडवरील हमीरगडजवळील गंगरार येथील वॉटर पार्कमधील ही घटना आहे. जिथे मोफत एन्ट्री न मिळाल्याने काही लोक बुलडोझर आणि शस्त्रे घेऊन वॉटर पार्कमध्ये पोहोचले आणि गोंधळ घातला. बुलडोझरने स्विमिंग पुलचे नुकसान केले आणि शेडही पाडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

यावेळी तरुणांनी वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करण्यास सुरुवात केली, यावेळी अर्धा तास तरुणांनी गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जेसीबीच्या सहाय्याने स्विमिंग पूलची तोडफोड करण्यात आली, इतकेच नाही तर त्यांनी गोळीबारही केला, त्यामुळे घबराट पसरली. या घटनेमुळे वॉटर पार्कमध्ये मौजमजेसाठी आलेल्या लोकांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.

Viral Video
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...