75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Volkhov River

Volkhov River : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियातील वोल्खोव्ह नदीच्या(Volkhov River) किनारी फेरफटका मारायला गेले असता लाट आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

Volkhov River : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियातील (Russia) वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी फेरफटका मारायला गेले असता लाट आल्याने त्यांचा बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दहा दिवसानंतर या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात त्यांच्या मूळगावी दाखल झाले. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 4 भारतीय विद्यार्थ्यांचा 4 जून रोजी वोल्खोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला होता. या मृत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील जिया पिंजारी व जिशान पिंजारी तसेच भडगाव (Bhadgaon) येथील हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

दहा दिवसानंतर या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात त्यांच्या मूळ गावी दाखल झाले असून अमळनेरमध्ये जिया व जिशान या भाऊ बहिणीवर मुस्लिम पद्धतीने तर भडगाव येथे हर्षल देसले या विद्यार्थ्यावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उसळला होता. अमळनेर येथील अंत्ययात्रेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी देखील सहभाग घेऊन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण…

दरम्यान, ही दुर्घटना घडण्याच्या आधी जिशान पिंजारी या विद्यार्थ्याने त्याच्या आईशी संपर्क साधला होता. यावेळी त्याची आतेबहीण जिया पिंजारी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे. हे क्षण जिशान आपल्या आईला दाखवत होता. त्यावेळी जिशानच्या आईने त्यांना लवकर पाण्याबाहेर निघण्यास सांगितले होते. यावर जिशानने आम्ही लगेचच घरी निघतो, असे म्हटले. मात्र आईने आणि मुलाचे संभाषण संपताच अवघ्या काही मिनिटात जिया, जिशान, हर्षल देसले आणि मुंबईतील एक असे चौघे नदीच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेमुळे जळगावात शोककळा पसरली आहे. 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...