75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Terrorist Attack

Terrorist Attack : अमरनाथ यात्रेवर 10 जुलै 2017 रोजी झालेला तो हल्ला गेल्या दशकात जम्मूमध्ये झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला(Terrorist Attack) होता.

 Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जण ठार आणि 33 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या बाबत माहिती दिली आहे. गुप्तचर एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्या धर्तीवर हा हल्ला करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेवर 10 जुलै 2017 रोजी झालेला तो हल्ला गेल्या दशकात जम्मूमध्ये झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला(Terrorist Attack) होता.

या प्रकरणी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहायक संघटनेने हा मोठा दहशतवादी हल्ला केला आहे. हल्लेखोरांची संख्या तीन ते चार असण्याची शक्यता आहे. हे हल्लेखोर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून भारतात घुसल्याचा संशय आहे. भाविकांवर अंदाधुंद गोळीबार करणं हा, दहशतवाद्यांचा प्राथमिक उद्देश होता. गोळीबार केल्यास बस अनियंत्रित होऊन ती दरीत कोसळेल याचा त्यांना अंदाज होता. त्यांचा अंदाज खरा ठरला आणि गोळीबारानंतर बस दरीत कोसळली.

काही दिवसांपूर्वी रियासी येथे झालेल्या बस अपघात लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी या हल्ल्याची योजना आखली आणि भाविकांनी भरलेल्या बसला लक्ष्य केलं. गोळीबारानंतर शिव खोडी मंदिराकडून कटराकडे जाणारी 53 आसनी बस खोल दरीत पडली. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ संध्याकाळी सहा वाजून 15 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.

रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी पत्रकारांना सांगितलं, “नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि इतर 33 जखमी झाले. हा हल्ला प्रदेशातील हिंसाचारातील चिंताजनक वाढ दर्शवतो. राजौरी आणि पूंछसारख्या शेजारील प्रदेशांच्या तुलनेत रियासी जिल्हा दहशतवादी कारवायांपासून लांब होता.”

सध्या वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी दररोज 42 ते 48 हजार भाविक कटरा येथील बेस कॅम्पला येत आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांनी घाबरू नये, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. पोलीस, सुरक्षा दल आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी आणि व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांसह भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम राबवली आहे. या घटनेत सहभागी असलेले सर्व दहशतवादी लवकरच मारले जातील, असा दावा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

Terrorist Attack
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...