Accident : दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढतच आहेत. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा यामुळे अपघात घडतात. त्यामुळे लोकांना रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना सावध राहण्यास सांगितलं जातं.
Accident : दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढतच आहेत. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा यामुळे अपघात घडतात. त्यामुळे लोकांना रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना सावध राहण्यास सांगितलं जातं. अशातच पालघरमध्ये एक अपघाताची घटना समोर आलीय. हा अपघात एवढा भीषण होता की, पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
वाडा भिवंडी महामार्गावर काल झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पाच वाहनांचा झालेला विचित्र अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे हा अपघात झाला.
या भीषण अपघातात चार जण जखमी असून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. भरधाव कंटेनरची समोरील कंटेनर आणि कारला धडक दिल्याने बाईकचाही अपघात झाला. अपघाताचं दृश्य खूप थरारक असून यामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी होऊन लोकांची गर्दी झाली होती.
दरम्यान, अशा अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. बऱ्याचदा चुकी नसतानाही काही लोकांना अपघाताचा सामना करावा लागतो. तर कधी गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होतो. असे एकापेक्षा एक भीषण अपघाताचे व्हिडीओ समोर येतच राहतात.