75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Shocking

Shocking : लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Shocking : लातूर (Latur News) जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Ausa) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा येथे शस्रक्रिया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे तीन महिने कापडी नॅपकिन पोटात राहिल्याने ही महिला मरणाच्या जबड्यातून थोडक्यात बचावली आहे. हबीबा वसीम जेवळे असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला तीन महिन्यांपूर्वी प्रसूतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर 23 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र बाळ बाहेर काढल्यावर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडी नॅपकिन मध्येच ठेवून टाके घेण्यात आले.

पोटात चक्क दीड बाय एक फुटाचा कापड 

दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिलेच्या पोटातून पाणी येत असल्याने हबीबा ही महिला पुन्हा औसा ग्रामीण रुग्णालयात आली असता, येथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे या महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले. तरीही टाक्यातून पाणी येत असल्याने औशातील दोन खाजगी डॉक्टरांचा उपचार या महिलेने घेतला. मात्र, टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले. सोनोग्राफी, सीटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता पोटात गाठ नाही तर चक्क दीड बाय एक फुटाचा कापड (मॉब) निघाला. हा कापडी नॅपकिन औशाच्या रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे. मात्र, या निमित्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून निष्काळजीपणाचा कळस औसा ग्रामीण रुग्णालयाने गाठला असल्याचे बोलले जात आहे.

चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार 

तर दुसरीकडे या प्रकरणी औसा ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारतकुमार थडकर म्हणाले कि, पोटात नॅपकिन निघालेल्या महिलेल्या प्रकरणावरून रूग्णालय  प्रशासन गंभीर आहे. या  संदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

Shocking
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...