75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Sandip Dhurve

Sandip Dhurve : भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात  नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Sandip Dhurve : भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात  नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. दरम्यान, डान्स व्हायरल झाल्यानंतर संदीप धुर्वे यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरादार टीका केली जात आहे. याबाबत आता संदीप धुर्वे यांनी भाष्य केलं आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते. 

गौतमीलाही मोह आवरला नाही, माझ्यासोबत ठेका धरला

संदीप धुर्वे म्हणाले, विरोधकांचं विरोध करणे हे काम आहे. या उबाठा आणि काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात दहीहंडीवर बंदी घातली होती. हिंदूंच्या सणावर बंदी घातली होती. ते आम्हाला काय शिकवणार? तिथे जनसमुदाय होता, तरुणाई होती. तिथल्या सर्व आयोजकांनी मला विनंती केली की, भाऊ आपण ठेका धरावा. आपण थोडं नाचावं. उत्तेजन दिल्यामुळे लोक खूश होतील. लोकांना, आयोजकांना, जनतेला खूश करण्यासाठी मी ठेका धरला.  गौतमी पाटील या महाराष्ट्रात नावाजलेल्या डान्सर आहेत. त्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही माझ्यासोबत ठेका धरला. त्याच्यामध्ये वाईट काय आहे? दहिहंडी हिंदूंचा सण आहे, आम्ही साजरा केला. उरला शेतकऱ्यांचा प्रश्न मला वडेट्टीवारांना सांगायचंय की, यवतमाळमधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणारा संदीप धुर्वेच आहे. 

शेतकऱ्यांना न्याय द्या, असा आदेश काढणारा संदीप धुर्वेच आहे

पुढे बोलताना संदीप धुर्वे म्हणाले, मी देवेंद्र फडणवीसांना विनंती केली , भाऊ आमचा ग्रामीण भाग आहे. आदिवासी बहुल भाग आहे. कित्येक लोकांजवळ अँड्रॉईड मोबाईल नसतो. त्यामुळे अनुदानापासून लोक वंचित राहतील. देवेंद्रजींनी आमचं ऐकलं आणि जीआर काढला. त्यानंतर जाचक अटी रद्द झाल्या. हे काम संदीप धुर्वेने केले. तीन दिवस मुसळधार पाऊस होता. पहिल्याच दिवशी तिन्ही तहसीलदारांना कितीही पाऊस असो पंचनामा करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, असा आदेश काढणारा संदीप धुर्वेच आहे. 

 भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटील सोबतचा डान्स चांगलाच वायरल झालाय. काल उमरखेड इथे दहीहंडीचा उत्सव होता. यावेळी दोघांनी एकत्र डान्स केला. दरम्यान, याबाबत बोलताना संदीप धुर्वे म्हणाले. यावर बोलताना टिका करणं विरोधकाचं कामच आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता की,आमचे सर्व तरूण मुले आहेत.जमाव अतिशय मोठा होता. गौतमी पाटील ह्या खूप फेमस आहेत. कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्या सोबत नाचली. उलट शेतकऱ्यांना पीक विमा साठी बैठक लावून एक लाख 98 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळून दिला. इ पीक पाहणीचे अट रुध्द केली. नुकसानीची पहिले पंचनामे करण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्ष फक्त राजकारण करत आहे, असंही धुर्वे म्हणाले.

 

Sandip Dhurve
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...