यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा अशी मागणी करत देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आहेत.
यवतमाळ (Yavatmal News) येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करुन मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहून, त्यांच्या बोटाला शाई लावून पैशाचं वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला. यानंतर यवतमाळ वाशिमचे मविआ उमेदवार संजय देशमुख या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा अशी मागणी करत देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आहेत.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती. त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात होते. विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता. याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली. मात्र बोटाला लावली जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.
परभणी लोकसभेसाठी मतदान होत. मात्र इथं आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचे समोर आलंय. परभणी शहरातील महात्मा फुले मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे, रझिया सत्तार या मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचं समोर आलंय. रझिया सत्तार या मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी केंद्र प्रमुख दवंडे यांना हा प्रकार सांगितला. तसेच काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तीबीरे यांना ही त्यांनी बोलावुन हा प्रकार सांगितला आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर काँग्रेस सह शिवसेनेचे पदाधिकारी ही जमले आहेत केवळ महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावरच नाही तर इतर मतदान केंद्रांवरही असाच प्रकार झाल्याचं आरोप काँग्रेस नेते सिद्धार्थ केंद्र यांनी केला असून यामागे भाजप असल्याचेही ते म्हणाले आहेत दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना सांगून तक्रारही त्यांच्या वतीने करण्यात आलीय.