Rohit Pawar : अजित पवार गटाकडून राज्यसभेवर कोणाला पाठवायचं? यावरुन खलबत सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी यावरुन टोला लगावला आहे.
Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांनी 4 जागा लढवल्या असून यात फक्त एकच उमेदवार निवडून आला. त्यांचा निवडून येण्याचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. तर बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने अजितदादांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांचाही पराभव झाला होता. अशात सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचं पुनरवसन करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे. आता रोहित पवारही आपल्या काकी आणि चुलतबंधूसाठी मैदानात उतरले आहेत.
आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2024
काय म्हणाले रोहित पवार?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल पटेल यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेवर कोणाला पाठवायचं? यावरुन चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात आता आमदार रोहित पवार यांनी काका अजितदादांना सल्ला दिला आहे. ‘आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना आगाऊमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन’, अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.
रोहित पवार अजितदादांसाठी मैदानात
अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचं नुकसान झाल्याची टीका पक्षाच्या गोटातून होत असल्याची चर्चा आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे. ‘अजितदादांसोबत जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावल्याची टीका ऑर्गनायझर मधून केल्याचं वाचनात आलं. केवळ राज्यातच भाजपला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती. पण भाजपची ब्रँड व्हॅल्यू ही लोकांनीच आणि संपूर्ण देशातच कमी केली. भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली हे मात्र वास्तव आहे. ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले त्या दिवसापासून आम्ही हेच सांगत होतो हे आज खरं होताना दिसत आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपची जुनी सवय आहे. आणि लोकांनाही हे आता माहीत झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलं, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावलाय.
Weather Forecast : विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांचा तडाखा! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांना ‘मुसळधार’ इशारा..