Pune Porsche Car Accident : पुणे पोर्श अपघात(Porsche Car Accident) प्रकरणानंतर एका रॅप सॉन्गचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे रॅप साँग करणारा अपघात करणारा अल्पवयीन मुलगा असल्याचा दावा केला जातोय.
Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कारच्या अपघातानंतर(Porsche Car Accident) एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँग गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे. पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर आता खुद्ध अल्पवयीन आरोपीच्या आईनेच खुलासा केला आहे.
आरोपीच्या आईचा खुलासा
पुणे पोर्श अपघात(Porsche Car Accident) प्रकरणानंतर एका रॅप सॉन्गचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे रॅप साँग करणारा अपघात करणारा अल्पवयीन मुलगा असल्याचं बोललं गेलं, पण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगितलं आहे. जामीन मिळाल्यानंतर या अल्पवयीन मुलाने एक रॅप सॉन्ग तयार केल्याचं बोललं गेलं होतं. या व्हिडिओमध्ये रॅप सॉन्ग करणारा मुलगा आपण पुन्हा रस्त्यावर खेळ दाखवायची भाषा करत आहे. तसंच त्याने रॅपमधून लोकांनाही शिवीगाळ केली आहे आणि लोकांवर वाहन चढवण्याची भाषा केली आहे. न्यूज 18 या व्हिडिओची पुष्टी करत नाही. यानंतर आता आरोपीच्या आईने व्हिडीओच्या माध्यमातून “तो” व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, असे स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच माझ्या मुलाला वाचवा अशी विनंतीही आरोपीची आई पोलिसांना करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
धो-धो कोसळणार पाऊस! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज हायअलर्ट..
रॅप गाण्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
त्यात म्हटलंय की, “मला जामीन मिळाला आहे, मी तुम्हाला पुन्हा रस्त्यावर खेळ दाखवतो. माझ्यासोबत चार मित्र होते, मी नशेत धुंद होतो. ते जोडपे माझ्या पोर्शसमोर आले. मला एका दिवसात जामीन मिळाला. मी पुन्हा रस्त्यावरचा खेळ दाखवीन.
पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीचा जामीन रद्द
पुण्यातील कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द केला आहे. बुधवारी तब्बल 8 तासांहून अधिक काळ या मंडळाची सुनावणी झाली. अपघातानंतर मुलाला तात्काळ जामीन मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुण्यात जाऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. मुलाचे वय 17 वर्षे 8 महिने असल्याने निर्भया प्रकरणानंतर सुधारित आदेशानुसार आरोपी अल्पवयीन असल्यास काही प्रकरणांमध्ये आरोपीच्या माहितीच्या आधारे पोलीस कारवाई करू शकतात.
पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये अल्पवयीन मुलाविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. बाल न्याय मंडळाने आता त्याचा जामीन रद्द करून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर सुरू होती चर्चा; मारहाणीत तरुणाचा मृत्यू..