75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

rain

Rain Updates : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून (IMD) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Updates : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून (IMD) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, अधून-मधून तीव्र पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

कोकणाप्रमाणेच मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात देखील आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वादळासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

दरम्यान पुण्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात पाऊस सुरूच असल्यानं खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग दुपटीनं वाढवण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांना पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो, इतरही काही शहरांना पूर परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो.

नको ते धाडस जीवावर बेतलं; पीर बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

 

rain
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...