75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Crime News :  छत्रपती संभाजीनगमधून मोठी बातमी समोर येत आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. वैजापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सहा दुचाकींसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैजापूर शहर आणि आसपासच्या परिसरातून ही टोळी दुचाकी चोरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या माहितीच्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Pune Heavy Rain : पुण्यात पुन्हा पूरस्थिती; खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर मधल्या खंडाळा येथे दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 6 दुचाकीसह 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वैजापूर शहर आणि आसपासच्या परिसरातून ही टोळी दुचाकी चोरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती,  त्यानुसार पोलिसांनी खंडाळा येथे जाऊन या टोळीला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सहा दुचाकी जप्त 

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सहा दुचाकी जप्त केल्या आहेत, तर तिघांना ताब्यात घेतलं आहे. तपास सुरू आहे, आणखी काही गुन्हे  उघडकीस येण्याची शक्यता या प्रकरणात पोलिसांनी वर्तवली आहे.

नको ते धाडस जीवावर बेतलं; पीर बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...