75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

manoj jarange

Manoj Jarange : राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाची महाराष्ट्रात गरज नसल्याचं म्हटलंय. यालाही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय.

Manoj Jarange :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. माथी भडकावून राजकारण करायचं इतकाच उद्योग सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, डोकं कोण भडकवंतय त्यांच्याच मित्र भडकवतो. तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटतात सागर बंगल्यावर जाऊन. मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू अशा शब्दात जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना सुनावलं.

राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाची महाराष्ट्रात गरज नसल्याचं म्हटलंय. यालाही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय. जरांगे पाटलांनी म्हटलं की, यांना आरक्षणाचं काही कळतच नाही त्यांना काय बोलावं. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मला उघडं पाडण्यासाठी हे डाव सुरु आहेत. सगळ्यांनी एकजुट होऊन लढा. त्यांना एक म्हणणं आहे,  गोर गरिब वंचिताचं म्हणणं आहे की सर्व सामान्यांची लाट आली पाहिजे. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

Crime News : छ. संभाजीनगरात दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 वाहनांसह 3 जण ताब्यात

मला राणेंनी धमकी द्यायची गरज नव्हती तेही फडणवीसांचं ऐकून. इतकं मागं लागेल की तुम्हाला पश्चाताप येईल. मी राणे साहेबांचा सन्मान करतो मला बोलू नका. कुणाला दोष देवून उपयोग नाही, हे सगळं फडणवीस करतो. शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देवू शकतात त्यांना आडवं येवू नये. तुम्ही प्रयत्न केलेत त्यात दुमत नाही पण मराठा कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा असंही जरांगे म्हणाले.

मी हटत नाही कुणाला मोजितही नाही काय करायचं तर करा. मी देवेंद्र फडणवीसला रोज बोलणार. 96 कुळी म्हणणारे असले आहेत का? ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या बाजूनं उभं राहायला लागले.  राणे साहेबांना दादा म्हणतो त्यांनी मराठा समाजाच्या बाजूनं उभं राहावं. भाजप मधला मराठासुद्धा आता पूर्ण क्षमतेनं बाहेर येवू लागल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं तर समाज कसं ऐकून घेईल. आघाडी फिगाडी नाही पण कोण एकत्र येईल याबाबत एक बैठक होईल. सगळे गोर गरिब एकत्र येऊन कचाकच पाडणार. ईडब्लूएस रद्द करा असं कधी म्हंटलं तुम्हाला? 10 टक्के देवून तुम्हीच ईडब्लूएस रद्द केलं. आम्हाला आरक्षण द्या आम्ही डोक्यावर घेवून नाचू. 10 वर्ष झालं तुम्ही धनगरांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. स्वाभिमान गहाण ठेवून तुमचे पाय चाटणाऱ्यात मी नाही. मी नाही फुटू शकत असंही जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...