75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

LPG

LPG Cylinder Price: लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच सरकारने खुशखबर दिली आहे. एलपीजी(LPG) सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत.

LPG Cylinder Price : लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच सरकारने खुशखबर दिली आहे. एलपीजी(LPG) सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी १ जून रोजी सिलिंडरच्या नव्या किंमती अपडेट्स केल्या आहेत. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचा अंतीम टप्पा आज होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी येणार आहे. निवडणूक निकालापूर्वी चांगली बातमी आली आहे. 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे.

IOCL च्या वेबसाइटनुसार, 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहे. एलपीजी सिलेंडरचे दर १ जून पासून नव्याने लागू केले आहे. आईल कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल आणि बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.त घरगुती सिलेंडरची किंमत 803 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 603 रुपये आहे.

LPG
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...