75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident

Accident News : 24 वर्षीय हा तरुण फक्त पॅंट घातलेली असून पूर्णपणे शरीर हे मातीनं माखलेलं आहे. या तरुणाने जो दावा केला ते ऐकून सगळेच हैराण झाले.

Accident News : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वकील असलेल्या व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. याहून वाईट म्हणजे ज्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा जीव गेला. त्या कुत्र्याचेही प्राण वाचू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी नगर शहरातील कासलीवारपुरम सोसायटीचे अध्यक्ष वकील भाऊसाहेब लांडगे हे नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला फिवण्यासाठी घराबाहेर पडले. ते कुत्र्याला घेऊन जवळच असलेल्या संग्राम नगर उड्डाणपुलाखाली आले होते. त्याच दरम्यान चिकलठाणाकडून रेल्वे येत होती. वकील भाऊसाहेब लांडगे यांनी रेल्वे रूळ ओलांडला. मात्र, कुत्रा मागे राहिल्याने ते त्याला घेण्यासाठी मागे वळले. तोपर्यंत रेल्वे जवळ येऊन त्यांचे डोके रेल्वेला लागले. यामध्ये कुत्रा आणि मालक भाऊसाहेब लांडगे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...