75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडवा सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका मानली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण यंदा गुढीपाडव्यावर सूर्यग्रहणाचे संकट असल्याचा दावा काहींनी केला आहे. याबाबत प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिलीय.

पाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अर्थात सोमवारी (दि. 8) सूर्यग्रहण आहे. मात्र ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तसेच पाडव्याच्या दिवशी वैधृत योग असला तरीही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवार (दि. 9) चा गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मुहूर्त आहे. त्यामुळे घरोघरी गुढी उभारून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे

इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; आधीच खोदला खड्डा, जेवायला जायचं सांगून नेलं अन्…

सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

यंदा चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1946 नववर्ष आरंभ 9 एप्रिल रोजी होत आहे. क्रोधीनाम संवत्सर असे त्याचे नाव आहे. याच्या आधी म्हणजेच 8 एप्रिल रोजी एक सूर्यग्रहण आहे. परंतु ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम भारतातील हिंदू बांधवांनी पाळू नयेत. त्यामुळे ग्रहणाचा करिदिन सुद्धा 9 एप्रिल नाहिये. तर 9 एप्रिलला वैतृती योग आहे. परंतु साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस गुढीपाडवा असल्याने वैतृती योगाचा विचार करण्याचे कारण नाहीये. साडेतीन मुहूर्तांचा शुभ दिवस हिंदू बांधवांनी आनंदात साजरा करायचा आहे. समजा आपल्याला काही दुकानाचे उद्घाटन, नवीन कामांचा शुभारंभ आदी गोष्टी आपण आवश्यक करू शकता, असेही दाते यांनी सांगितले.

Accident : समोर सळईने भरलेला ट्रक अन् बुलेट घेऊन तो जात होता, मागून कंटेनर येऊन आदळला,पाच वाहनांचा झालेला विचित्र अपघात.. video सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...