अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहाटे पाचच्या सुमारास दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाधुंद गोळीबार केला. पहाटे पाचच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा गोळीबार कोणी व का केला याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एकूण 6 राऊंट फायर केले. त्यातील एक गोळी सलमान खानच्या गॅलरीमध्ये मारण्यात आली आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेचा शोध घेण्याकरता फॅारेन्सीक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, तर एक टीम तांत्रिक तपास करत आहे.
मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा, तारीखही सांगितली..
घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान सलमान खानला याआधी देखील बिश्नोई गॅंगकडून अनेकवेळा मारण्याची धमकी आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सलमान खानला पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आला आहे. मात्र असं असताना देखील सलमान खानच्या घरासमोर गोळीबारीची घटना घडली आहे.
पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुचाकीवर बसून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मुंबई हादरली असून, खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
…आणि उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, प्रकाश आंबेडकरांना मारला टोमणा..