75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

आत्महत्या

भाईंदरमध्ये पितापुत्राची लोकल ट्रेनखाली आत्महत्या, विदारक घटनेने खळबळ. या दोघांनी स्वत:ला ट्रेनसमोर झोकून दिले. भाईंदर रेल्वे स्थानकातील घटना. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात वडील आणि मुलाने स्वत:ला लोकल ट्रेनसमोर (Mumbai Local Train) झोकून देत एकत्रित आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकल ट्रेनखाली येऊन आत्महत्या (Mumbai Suicide) करणाऱ्या पितापुत्रांची ओळख पटली आहे. हरिश मेहता (वय 60) आणि त्यांचा मुलगा जय मेहता (वय 32)  अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी कर्जबाजारीपणाच्या (Loan)समस्येमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मृत हरिश मेहता हे पूर्वी मुंबईतील शेअर मार्केटमध्ये (Share Market) कामाला होते. तर जय मेहता हा डीटीपी ऑपरेटर होता. ते वसईला राहायला होते. वर्षभरापूर्वीच जयचे लग्न झाले होते. हरिश आणि जय मेहता यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीत प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्या डोक्यावर कर्ज होते. याच चिंतेने ग्रासल्यामुळे या बापलेकाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हरिश आणि जय मेहता हे दोघेही भाईंदर स्थानकातून रेल्वे ट्रॅकपर्यंत चालत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये बापलेक फलाटावरून चालत जात रेल्वे रुळांवर उतरल्याचे दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानंतर हे दोघेही विरारच्या दिशेने चालू लागले. त्यावेळी या दोघांना फास्ट ट्रॅकवरुन चर्चगेटला जाणारी ट्रेन येताना दिसली. या ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये, यासाठी वडील आणि मुलगा दोघेही सुरुवातील शेजारच्या ट्रॅकवरुन चालत होते. मात्र, चर्चगेट लोकल अगदी जवळ आल्यानंतर बापलेक एकमेकांचा हात धरुन ट्रेनसमोर गेले आणि ट्रॅकवर झोपले.

या दोघांनाही रेल्वे ट्रॅकवर झोपताना आपापलं डोकं रुळांवर ठेवलं होतं. त्यामुळे लोकल ट्रेन या दोघांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. सोमवारी सकाळी 10 वाजता या दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. मात्र, डोके छिन्नविछिन्न झाल्याने या दोघांची ओळख पटत नव्हती. अखेर पोलिसांनी त्यांच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डावरुन या दोघांची ओळख पटवली. या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आत्महत्या
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...