75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

rain news

Rain Alert in Maharashtra : राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Alert in Maharashtra : मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C च्या आसपास असेल.कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवस पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. इथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...