75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

अंबड तालुक्यातील बनटाकळी गावातील गट न. 5 कर्जाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नानासाहेब कानकाटे व संगीता अशोक कानकाटे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. याची नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

https://maheshvarta.in/who-exactly-is-mla-nilesh-lanke/

काल सकाळी नऊ वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. अशोक आणि संगीता यांच्यावर बचत गट, मायक्रो फायनान्स कंपनीचे व समर्थ सहकारी बँक आणि ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांतच गेल्या वर्षी मुलीच्या लग्नालाही त्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. या वर्षी विहिरीला पाणी नसल्याने हे कर्ज या वर्षी कसे फेडावं या विवंचनेत हे पती -पत्नी होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. याप्रकणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.

शेतकरी
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...