75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Elvish Yadav

Elvish Yadav : एल्विशच्या लाइफस्टाइलबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. अशताच आता एल्विशच्या संपत्तीबद्दल त्याच्या आई-वडिलांनी खुलासा केला आहे.

Elvish Yadav : गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस OTT 2 चा (Bigg Boss OTT) विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) हा चर्चेत आहे. एल्विश सध्या तुरुंगात आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. सोशल मीडियावर एल्विशबाबत अनेक बातम्या पसरत आहे. एल्विशच्या लाइफस्टाइलबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते.अशताच आता एल्विशच्या संपत्तीबद्दल त्याच्या आई-वडिलांनी खुलासा केला आहे.

एल्विश यादवचे(Elvish Yadav) गुडगावमध्ये फ्लॅट्स आहेत, तसेच त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे, असं असं सोशल मीडियावर बोललं जातं. अशताच आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये एल्विशच्या वडिलांनी त्यांच्या संपत्तीबद्दल आणि एल्विशच्या लाइफस्टाइलबद्दल सांगितलं आहे.

काय म्हणाले एल्विशचे वडील?

एल्विशच्या वडिलांनी सांगितलं, “माझ्या मुलाकडे कोणत्याही आलिशान गाड्या नाहीयेत. आमच्याकडे फक्त दोन गाड्या आहेत. फॉर्च्युनर आणि वॅग्नार या दोनच गाड्या आमच्याकडे आहेत. एल्विशकडे कोणतीही प्रॉपर्टी नाहीये. आम्हाला फक्त एका जमिनीच्या बदल्यात प्लॉट मिळाला आहे. एल्विश व्हिडीओसाठी मित्रांच्या गाड्या भाड्याने घेतो. बिग बॉस जिंकल्यानंतर एल्विशला पैसे मिळाले, तसेच एल्विशने कपड्यांचा व्यवसाय केला, जॅकेट विकले आणि YouTube वरील व्हिडीओंमधून पैसे कमवले.” जेव्हा मुलाखतीमध्ये एल्विशच्या पालकांना त्याच्या YouTube कमाईबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, “जेव्हा एल्विश तुमच्याकडे मुलाखत द्यायला येईल तेव्हा तुम्ही त्याला YouTube कमाईबद्दल विचारा . आमचा मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे.”

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...